Scheme for G.I. Registered Products 2024 भौगोलिक मानांकन प्राप्त उप्तादनांसाठी योजना
प्रस्तावना : एखाद्या भौगोलिक प्रदेशातील वैशिष्ठ्यांमुळे, हवामान, संस्कृतीमुळे, एखाद्या उत्पादनात, त्याच्या उत्पादन प्रक्रियेत अनेक वर्ष दर्जा, चव, रंग, वास उतरत असतील, ते वर्षानुवर्ष कायम राहत असतील, तर अशा उत्पादनांची नोंदणी भौगोलिक निर्देशन नोंदणी कार्यालय चेन्नई येथे करता येते. यामुळे अशा उत्पादनांना दहा वर्षे इतर प्रदेशातल्या अनधिकृत उत्पादनांपासुन, भेसळ होणे, रास्त किंमतीपेक्षा कमी किंमत मिळणे यासारख्या गोष्टींपासुन संरक्षण मिळते व परत संरक्षण कालावधी वाढवता येतो. यामुळे या प्रदेशातील स्थानिक उत्पादकांना अधिकाधिक आर्थिक लाभ मिळण्याची संधी उपलब्ध होत असते.
भौगोलिक चिन्हांकन / मानांकन प्राप्त उत्पादनांच्या अधिक उत्पादनांसाठी तसेच या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याच्या दृष्टीने राज्यामध्ये कृषि विभागातर्फे आणि महाराष्ट्र कृषि स्पर्धात्मक प्रकल्प या अंतर्गत एकुण २४ कृषी उत्पादनांना भौगोलिक चिन्हांकन / मानांकन प्राप्त झाले आहे. या एकुण २४ कृषी उत्पादनाकरीता राज्यामध्ये २७ उत्पादकांच्या संस्था कामकाज करीत आहेत.
राज्यामध्ये कृषी उत्पादनाकरीता भौगोलिक चिन्हांकन / मानांकन प्राप्त करुन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात कामकाज झाले असले तरी शेतक-यांना भौगोलिक चिन्हांकन / मानांकन बाबत माहीती करुन देणे यामुळे होणारे फायदे, उत्पादनासाठी अनुसरावयाची कार्यपद्धती, उत्पादनाची प्रत, पँकिंग, वापरावयाचा लोगो व या सर्वाकरीता नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त संस्था यांचेकडे आवश्यक मनुष्यबळ आणि आर्थिक परिस्थिती नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे भौगोलिक चिन्हांकन / मानांकन संदर्भातुन प्रचार प्रसिद्धी करणे, त्या कृषीमालाच्या उत्पादकांच्या संस्थेकडे शेतक-यांची, निर्यातदारांची, प्रक्रियादारांची नोंदणी करणे, तसेच त्यांचे कृषीमालाची बाजारसाखळी विकसित करणे यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत योजना राबविणे प्रस्तावित होते.