Japan Fund for Poverty Reduction (JFPR)
महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत फिरता निधी (Revolving Fund) वितरीत करण्याकरीता मार्गदर्शक सुचना
निधी वितरित करण्याची कार्यपद्धती
- शेतकरी उत्पादक कंपनी त्यांना ज्या कामासाठी निधीची आवश्यकता आहे त्याच्या तपशिलासह सविस्तर प्रस्ताव विहित नमुन्यात कृषि पणन मंडळाच्या संबंधित विभागीय कार्यालयाकडे सादर करेल.
- या प्रस्तावात कामाचे स्वरुप, अंमलबजावणीचे वेळापत्रक, प्रस्तावित आर्थिक ताळेबंद, निधीचे स्त्रोत (स्वनिधी/कर्जे / ठेवी इ.), सदस्यांना होणार असलेला फायदा या बाबींचा आवर्जून समावेश असावा.
- प्राप्त प्रस्तावांची छाननी कृषि पणन मंडळाच्या विभागीय कार्यालयामार्फत पुर्ण करण्यात येईल व प्रस्ताव परिपूर्ण असल्यास मुख्यालयाकडे निधी वितरित करण्याची शिफारस करेल.
- सदर प्रस्तावासोबत मागणी केलेल्या निधीच्या सम प्रमाणात रक्कम शेतकरी उत्पादक कंपनीच्या बँक खात्यावर जमा केल्याचे शाखाधिका-याचे प्रमाणपत्र त्यांच्या बँक स्टेटमेंटच्या स्वसाक्षांकित प्रतीसह सादर करेल.
- मागील निधीची पुर्ण परतफेड होईपर्यंत नविन प्रस्ताव कोणत्याही परिस्थितीत मंजूर केला जाणार नाही.
- निधी परतफेड करण्याचा कालावधी जास्तीत जास्त एक वर्षाचा असेल.
- निधी वितरित केल्यापासून ३ महिन्यानंतर परतफेड चालू होईल. परतफेड तीन टप्यात अथवा एकरकमी करता येईल. तसा तपशिल / उल्लेख प्रस्तावात देणे आवश्यक राहील.
- वितरित निधी मंजूर केलेल्या बाबीवरच खर्च करण्याचे बंधन FPC वर असेल. तसे न झाल्यास दिलेली रक्कम व्याजासह त्वरीत परत द्यावी लागेल.
- सदर निधीचा विनियोग निधी वितरित केलेल्या दिनांकापासून ३ महिन्याच्या आत करणे बंधनकारक असेल.
- फिरता निधी व्यवस्थापनासाठी (योजनेस प्रसिध्दी देणे, निधी मागणीचे प्रस्ताव स्विकारणे, त्यांची छाननी करणे, मंजूरी देणे व आवश्यकता भासल्यास वसूली करणे इत्यादी) कृषि पणन मंडळास येणारा खर्च भागविण्यासाठी कृषि पणन मंडळामार्फत प्रत्यक्ष वितरीत करण्यात आलेल्या रकमेवर द.सा.द.शे. ४ टक्के दराने व्यवस्थापन खर्च आकारण्यात येईल.
- शेतकरी उत्पादक कंपनीने वितरीत रकमेची विहित मुदतीत परतफेड न केल्यास थकीत रकमेवर द.सा.द.शे. १२ टक्के दराने दंडात्मक व्याज आकारण्यात येईल.
अधिक माहितीसाठी संपुर्ण PDF डाऊनलोड करा